रविवार, ७ एप्रिल, २०१९

सार्थ दत्तबावनी :विक्रांत

सार्थ दत्तबावनी :विक्रांत





।। श्री गुरूदेव दत्त ॥

मित्रांनो ,स्वान्तसुखाय केलेला हा प्रयत्न आहे .थोडेफार कळणारे गुजराथी व शब्दकोश यांच्या मदतीने दत्त बावनी समजून घेतली .तो अभ्यास आहे.

 भावार्थ दत्तबावनी 

।। श्री गुरूदेव दत्त ॥

जय योगिश्वर दत्त दयाळ

तुज एक जगमा प्रतिपाळ ||1|| 

हे योगीश्वर दत्तात्रेया तुझा जयजयकार असो,तू अतिशय दयाळू असून सर्व जगाचा प्रतिपाळ म्हणजे  पालन पोषण करतोस


अत्र्यनसुया करी निमित्त

प्रगट्यो जगकारण निश्चित् ||2|| 

अत्री ऋषी आणि माता अनसुया यांच्या घरी जन्म येण्याचे तू केवळ निमित्त केले आहे (खरा तर तू जन्म मृत्यू यांच्या पलीकडचा आहेस )

परंतु तुझी अगाध करुणा म्हणून तू केवळ या जगासाठी त्याच्या उद्धारासाठी प्रकट झालं आहेस 

ब्रम्हा हरिहरनो अवतार

शरणागतनो तारणहार् ||3|| 

देवा,तू ब्रह्मा ,विष्णू आणि महेश यांचा अवतार आहेस .तू शरण आलेल्या दिन आर्त जनांचा रक्षण करणारा ,त्यांना संकटातून सोडवणारा आहेस 


अन्तर्यामि सतचितसुख

बहार सद्गुरु द्विभुज सुमुख् ||4|| 

सर्व देहा मध्ये वास करणारे सत-चित-आनंदरूपी आत्मतत्व तू आहेस .आणि बाहेर मात्र दोन भुजा असलेला सद्गुरू म्हणून समोर उभा आहेस 

झोळी अन्नपुर्णा करमाह्य

शान्ति कमन्डल कर सोहाय ||5|| 

तुझ्या हातातील झोळी खरे तर स्वत:च अन्नपूर्णा आहे (तरीही तू जन कल्याणाच्या मिषे भिक्षा मागत आहेस )शांती ही तुझ्या हातातील कमंडलूच्या रूपाने सुभोभित झाली  आहे 

क्याय चतुर्भुज षडभुज सार

अनन्तबाहु तु निर्धार ||6|| 

तू कुठे चतुर्भुज रूप धारण करतोस तर कधी षड्भुज रूप धारण करतोस .पण खरे तर तू अनंत बाहू आहेस म्हणजेच तुझ्या रुपाला मर्यादा नाही .

आव्यो शरणे बाळ अजाण

उठ दिगंबर चाल्या प्राण ||7|| 

हे प्रभू ,हा अजाण बाळ तुला शरण आला आहे .हे दिगंबरा उठ त्याचा स्वीकार कर,तुझ्यावाचून त्याचा प्राण जावू पाहत आहे 

सुणी अर्जुण केरो साद   

रिझ्यो पुर्वे तु साक्शात ||8|| 

पूर्वी सहस्त्रार्जुनाने तुला भक्ती प्रेमाने साद घातली ती ऐकलीस आणि तू  त्याच्या समोर साक्षात प्रकट होवून  त्याचे मनोरथ पूर्ण केलेस 

दिधी रिद्धि सिद्धि अपार

अंते मुक्ति महापद सार ||9|| 
त्याला तू अपार रिद्धी सिद्धीचे दान दिलेस ,आणि अंती आपल्या पावन चरणावर मुक्ती प्रदान केलीस 

किधो आजे केम विलम्ब

तुजविन मुजने ना आलम्ब ||10|| 

तर मग हे देवा आज का हा उशीर करीत आहेस .तुझ्यावाचून मला दुसरे काही सुचत नाही 

विष्णुशर्म द्विज तार्यो एम

जम्यो श्राद्ध्मां देखि प्रेम ||11|| ॥  

तू विष्णू शर्मा या ब्राह्मणाचा तारणहार झालास ,भक्ताच्या प्रेमासाठी त्याच्या घरी जावून श्राद्धाचे जेवण जेवलास 

जम्भदैत्यथी त्रास्या देव

किधि म्हेर ते त्यां ततखेव ||12||  

जंभ दैत्याच्या त्रासाने देव शिणले होते परंतु त्याचा नाश करून देवांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुलवले .


विस्तारी माया दितिसुत     

इन्द्र करे हणाब्यो तुर्त ||13||  

दिती सुताने आपल्या मायेच्या प्रभावाने देवांना जेरीस आणले तेव्हा तू देवेंद्राला मदत केलेस अन त्याच्याकडून त्याचा संहार केलास .

एवी लीला कइ कइ सर्व   

किधी वर्णवे को ते शर्व ||14||  

अशी जी काही अपूर्व लीला तू केली आहेस तिचे वर्णन भगवान शंकराला वर्णन करता येत नाही 


दोड्यो आयु सुतने काम                                

किधो एने ते निष्काम ||15||    

राजा आयुच्या पुत्रासाठीराजा नहुषासाठी तू धाव घेतलीस आणि त्याला तू निष्काम केलेस    

बोध्या यदुने परशुराम

साध्यदेव प्रल्हाद अकाम ||16|| 

तू राजा यदु ,परशुराम ,सांध्यदेव आणि प्रल्हाद यांना बोध केलास (अन त्यांना अकाम केले अकर्म स्थितीला नेवून पोहचवले) 


एवी तारी कृपा अगाध

केम सुने ना मारो साद ||17|| 

अशी तुझी कृपा अगाध आहे ,तर मग तू माझी हाक का ऐकत नाहीस  ? 

दोड अंत ना देख अनंत

मा कर अधवच शिशुनो अंत ||18|| ॥ 

हे अनंता तू माझा अंत पाहू नकोस .या बाळाचा असा मध्येच शेवट करू नकोस त्याला तार .


जोइ द्विज स्त्री केरो स्नेह     ॥ 

थयो पुत्र तु निसन्देह ||19||   

द्विजस्त्रीचा स्नेह पाहुनि तू नि:संदेहपणे तिचा पुत्र झालास 


स्मर्तृगामि कलिकाळ कृपाळ

तार्यो धोबि छेक गमार ||20||  

तू स्मरण करताच भक्तासाठी धावतोस ,तू कलीचा नाश करणारा कृपाळू आहेस ,तू गावंढळ धोब्याचा उद्धार केलास .


पेट पिडथी तार्यो विप्र

ब्राम्हण शेठ उगार्यो क्षिप्र ||21|| 

पोट शूळाने त्रस्त झालेल्या ब्राह्मणाला वाचवलेस .ब्राम्हण श्रेष्ठीचा त्वरित उद्धार केलास 

करे केम ना मारो व्हार         

जो आणि गम एकज वार ||22||   

असा तू माझ्या मदतीला का येत नाहीस ,हे प्रभू ये आणि माझ्याकडे एकदाच पहा 

शुष्क काष्ठणे आंण्या पत्र

थयो केम उदासिन अत्र ||23|| 

तू सुकलेल्या काष्टाला पाने आणलीस ,मग मज बाबातुत का उदास झाला आहेस  


जर्जर वन्ध्या केरां स्वप्न     

कर्या सफळ ते सुतना कृत्स्ण ||24||  

तू म्हाताऱ्या वांज स्त्रीचे स्वप्न  पुरे केलेस तिला पुत्र रत्न प्रदान करून सफळ केलेस 

करि दुर ब्राम्हणनो कोढ

किधा पुरण एना कोड ||25|| 

तू ब्राह्मणाचे कुष्ट दूर केलस .तर मग माझा हट्ट का पुरा करीत नाहीस 

वन्ध्या भैंस दुझवी देव

हर्यु दारिद्र्य ते ततखेव ||26|| 

तू वांझ म्हशीला दुध आणलेस .त्यांचे दारिद्र क्षणात घालवलेस 

झालर खायि रिझयो एम  

दिधो सुवर्ण घट सप्रेम ||27|| 

भिक्षेतील घेवडा खावून प्रसन्न झालास अन त्या बदली त्यांना सुवर्ण भरलेला घडा दिलास 


ब्राम्हण स्त्रिणो मृत भरतार

किधो संजीवन ते निर्धार ||28|| 

तू ब्राम्हण स्त्रीचा मेलेला पती तिची भक्ती व निर्धार पाहून पुन्हा जिवंत केलास 

पिशाच पिडा किधी दूर

विप्रपुत्र उठाड्यो शुर ||29|| 

तू पिशाच बाधा नष्ट करून ब्राह्मणाचा पुत्र जिवंत केलास आ तू पराक्रमी आहेस 

हरि विप्र मज अंत्यज हाथ

रक्षो भक्ति त्रिविक्रम तात ||30|| 

तू गर्विष्ठ ब्राह्मणाचा गर्व अंतजाकडून उतरविला आणि आपला भक्त त्रिविक्रम याचे रक्षण केलेस 

निमेष मात्रे तंतुक एक

पहोच्याडो श्री शैल देख ||31|| 

एका क्षणार्धात विणकराला श्री शैल पर्वतावर पोहचवलेस 


एकि साथे आठ स्वरूप

धरि देव बहुरूप अरूप ||32|| 

एकाच वेळी आठ रूपे घेतलीस,देवा असा तू बहूरूप धरूनही पुन्हा अरूप आहेस 

संतोष्या निज भक्त सुजात

आपि परचाओ साक्षात ||33|| 

तू आपली भक्तांना संतोष देतोस त्यांना साक्षात प्रचिती देतोस 

यवनराजनि टाळी पीड            

जातपातनि तने न चीड ||34|| 

तू यवन राजाची पिडा जो कोड होता तो नष्ट केलास .तुला जातपातीशी काही देणे घेणे नसते 


रामकृष्णरुपे ते एम

किधि लिलाओ कई तेम ||35|| 

राम कृष्ण ही तुझीच रूपे आहेत .या रूपांनी तूच तूच सर्व लीला केली आहेस 

तार्या पत्थर गणिका व्याध

पशुपंखिपण तुजने साध ||36||  

तू दगड वेश्या पारधी यांचा उद्धार केलास ,पशु पक्षी सुद्धा तुला साद घालतात (अन तू त्यांना प्रतिसाद देतास)


अधम ओधारण तारु नाम

गात सरे न शा शा काम ||37||

तुझे नाम स्मरण केल्याने अधमांचा उद्धार होतो, ते म्हटल्याने कुठले काम होत नाही? 


आधि व्याधि उपाधि सर्व

टळे स्मरणमात्रथी शर्व ||38|| 

सर्व प्रकारची आधी व्याधी उपाधी तुझ्या स्मरण मात्रेची पूर्णत:नष्ट होतात 


मुठ चोट ना लागे जाण

पामे नर स्मरणे निर्वाण ||39|| 

तसेच कुणी केलेली मुठबाधा करणी लागत नाही तव स्मरणे नराला निर्वाण प्राप्त होते 


डाकण शाकण भेंसासुर

भुत पिशाचो जंद असुर ||40|| 

डाकीनी शाकीनी म्हसोबा भूत पिशाच्च जिंद असुर ..ही सर्व भूत सृष्टी 

नासे मुठी दईने तुर्त     

दत्त धुन सांभाळता मुर्त ||41||    

दत्त नामची धून पाहताच ऐकताच मुष्टी  आवळून पळत सुटतात 


करी धूप गाये जे एम  

दत्तबावनि आ सप्रेम ||42|| 

जो कूणी धुप करून  अत्यंत प्रेमाने ही दत्त बावनी गाईन 


सुधरे तेणा बन्ने लोक  

रहे न तेने क्यांये शोक ||43|| 

त्याचे इह परलोक मार्गी लागतील अन त्याला शोकास काही कारण उरणार नाही 


दासि सिद्धि तेनि थाय

दुःख दारिद्र्य तेना जाय ||44|| 

सर्व सिद्धी त्याच्या दासी होतील अन त्याचे दुख दारिद्र नष्ट होईल 


बावन गुरुवारे नित नेम

करे पाठ बावन सप्रेम ||45|| 

जो कुणी बावन गुरुवार नियमितपणे प्रेमाने हा पाठ करेल 

यथावकाशे नित्य नियम

तेणे कधि ना दंडे यम ||46|| 

शांत सावकाशपणे नित्य नियमाने केलेल्या पाठामुळे त्याला यमदंडाची भीती राहणार  नाही 

अनेक रुपे एज अभंग    

भजता नडे न माया रंग ||47||    

अनेक रुपात अनेक प्रकारे या अभंगाने प्रभूला जो भजतो त्याला माया कधीच त्रास देत नाही 

सहस्त्र नामे नामि एक     

दत्त दिगंबर असंग छेक ||48||    

त्याला सहस्त्र नावे असली तरी तो नामी एकच आहे. अन तो हा केवळ एकच असंग(नाम गोत्र विवर्जित) दत्त दिगंबर आहे  

वंदु तुजने वारंवार

वेद श्वास तारा निर्धार ||49|| 

हे प्रभू तुला मी वारंवार वंदन  करतो  वेद श्वास हे निश्चितपणे तुझा श्वास आहेत 

थाके वर्णवतां ज्यां शेष

कोण रांक हुं बहुकृत वेष ||50||   

ज्याचे वर्णन करतांना सहस्त्र मुखी शेष थकून जातो तर मी विविध रुपात नटूनही त्या पुढे केवढा बापुडा आहे 

अनुभव तृप्तिनो उद्गार

सुणि हंशे ते खाशे मार ||51||

हे माझे अनुभव तृप्त उद्गार आहेत जो कुणी याची टवाळी करत हसेल त्याला जरूर मार पडेल शिक्षा मिळेल  

तपसि तत्वमसि ए देव

बोलो जय जय श्री गुरुदेव ||52|| 

तपस्येने प्राप्त होणारा हा देव असून तत्वमसी हेच त्याचे खरे स्वरूप आहे म्हणून सारेजण त्याचा जयजयकार करुयात, म्हणा जय जय श्री गुरुदेव .


|| अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||


स्वैर अनुवादक

 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 

http://namsmarandhyan.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

श्रीपाद सखी

श्रीपाद सखी *********** स्वप्न हरखले डोळीया मधले  स्वप्नास लंघुनी स्वप्न हे उरले ॥१ नभात लक्ष दीप उजळले  अन चांदण्याचे तोरण जाहल...