रविवार, २१ एप्रिल, २०१९

काळात्मा




काळात्मा

तुझा विनवणी 
करीतो नमुनी 
काळात्मा येऊनी 
छळू नको ॥ 

धर्माची वासना 
करीना छेदन 
हे अंत करण 
शुद्ध राहो ॥

कलिचे सांगाती 
येऊ नको द्वारा 
जाऊ दे रे घरा 
दत्ताचिया॥

तसा तर आहे 
मी तो छळलेला 
भारे वाकलेला 
पापाचिया॥

बाप राखतोय 
म्हणूनही रक्षिला 
अंतरी ठेविला 
अवधूत ॥

विक्रांत कळाली 
कळीकाळ मेख
म्हणूनही विवेक 
मागे दत्ता ॥

श्री गुरुदेव दत्त ॥

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
****

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सूर्य

सूर्य  **** दिशा पेटवून सूर्य  होताच नामा निराळा  ती वाट दिगंतरीची  करुनी पायात गोळा ॥ ते स्वप्न चांदण्याचे त्याला कसे कळावे  मि...