रविवार, ७ एप्रिल, २०१९

माझे स्वामी




 माझे स्वामी
**************

प्रिय माझे स्वामी
यावे माझे मनी
जन्म उजळूनी
जावे फक्त

पाहील्या वाचून
सजवले मनी
प्रीतीच्या फुलांनी
रात्रंदिन

कुणी संतजन
गेली ती सांगून
कवण्या रीतीन
भेटे प्रिय

असे काय खोटं
धाचे ते बोट
चवीविना ओठ
गोडावली

तुम्हासाठी केली
किती धडपड
लागुनिया वेड
नादावलो

विक्रांत न व्हावा
आयुष्याचा वेच
मागणे ते हेच
तुझ दत्ता
© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सूर्य

सूर्य  **** दिशा पेटवून सूर्य  होताच नामा निराळा  ती वाट दिगंतरीची  करुनी पायात गोळा ॥ ते स्वप्न चांदण्याचे त्याला कसे कळावे  मि...