बंद दार
****
कधी दारे होतात बंद खूप दिवस न उघडल्या गेल्याने
बिजागऱ्या गंजून
तर कधी केली जातात बंद
हेतू पुरस्पर जाणून बुजून
कडी कोयंडा घालून
दिलेली साद ऐकूनही न ऐकून
दार लावले गेले किंवा लागले गेले
तरी त्याला फारसा अर्थ नसतो
दार बंद झाले की तेथे
घुटमळू नये पुन्हा कधी
मग भले तिथे होणार नाही
कधी तुमचा अपमान
दिले जाणार नाही
कधी तुम्हाला हाकलून
पण बंद दार असते
स्वरूप नकाराचे
टाळलेल्या स्वागताचे
अन् स्वाभिमानाला
ताटकळत ठेवण्यासारखी
दुखरी ठेच लागत नसते कधी
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा