वरदान
******
उगा उगाच पथात पाऊस पडुन गेला थकल्या जीवा तजेला क्षणात देऊन गेला
मागेपुढे होता दग्ध रखरखाट सारा
व्याकुळले प्राण तप्त शितल करून गेला
घनमेघ दाटले तो गारवा हवासा होता
ती गाठ जरी क्षणाची हृदयी कोरून गेला
भिजले जरी न ओठ तृष्णा तशीच व्याकुळ
हलकेच तुषारांनी पुष्प सजवून गेला
नव्हतेच इंद्रधनु रंगीत स्वप्न त्यात
गंध मातीचाच मुग्ध मनात पेरून गेला
नव्हतेच मागितले ओघळून गीत झाला
वरदान जीवनाला जणू की देऊन गेला
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा