मंगळवार, १ ऑगस्ट, २०१७

पापाच्या डोंगरी पुण्याचा महाल




पापाच्या डोंगरी पुण्याचा महाल
पाहता कळेल ज्याचा त्याला ||
मातीचा डोंगर मातीचा महाल
परंतु कमाल पाहण्याची ||
घडता घडले रूपी सजविले  
जगा न कळले काही केल्या ||
कुणी वाढवली कुणाला कळली
चिंता सजविली प्रतिमेने ||
उघडले डोळे झाले किलकिले
प्रकाशा बिहाले आवडून ||
अंतरी बाहेरी चाललाय खेळ
विक्रांत केवळ नाव आहे ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आळंदी जाऊन

आळंदी जाऊन *********** आळंदी जाऊन होई रे पावन  जन्माचे कल्याण घडे तिथे ॥१ तया पायरीशी घाली लोटांगण  भक्तांची चरण धूळ घेत ॥२ राम ...