दत्त लहरी
**********
मोहाच्या कर्दमी दत्त बुडवतो आणिक हसतो मोठ्याने रे ॥
अपकीर्ती धूळ दत्त उडवतो
आणि रडवतो पुन्हा पुन्हा ॥
प्रतिमा फोडतो चित्र उलटतो
नकोसे करतो जगतात ॥
आणिक थांबता बाहेरी धावणे
येऊन प्रेमाने कुरवाळतो ॥
देतो उघडून प्रज्ञेचे विभव
भक्तीचे लाघव लाडक्यांना ॥
विक्रांता कळल्या दत्ताच्या लहरी
कोंडून अंतरी धरीला रे ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा