************
आज पावसात आलो रे भिजून स्वामींना पाहून अंतरात ॥१
पाहिली ती मूर्त नच पाहियली
मनी ठसलेली आपसूक ॥२
ऐकले बोलणे कानी न पडले
मधाळ कोवळे हळुवार ॥३
जाहले उघडे मन दडलेले
दिगंबर भोळे बाळापरी ॥४
घेतला प्रसाद हळूच हातात
टाकला मुखात आनंदाने ॥५
अन वाचली ती नित्य ज्ञानेश्वरी
शब्द कृपा करी निवडक ॥६
तरारले तृण गेलेले वाळून
तार झंकारून आली सोहं ॥७
पाहियले ऐसे स्वप्न जागेपणी
विक्रांते रंगुनि चरित्रात ॥८
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा