रविवार, ८ जून, २०१४

सखी !








जाणार जरी तू
नक्की असते
येणार कधी ते  
माहित नसते
भले थोरले
कुलूप कडीला
सदा न कदा
मला खिजवते
त्या दारावर
जीव माझा
एक बिचारे
लटकणे होते
अन खटखटता
कडी कुठली
मन बावरे
उगा धावते
चार शब्द
स्मित क्षणांचे
बाकी काही
कशात नसते
माझे वेडे
स्वप्न धुळीचे
सखी आभाळाला  
जावून भिडते

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

साधने

साधन  ****** भजता भजता भजन हरावे  स्पंदन उरावे भजनाचे ॥१ स्मरता स्मरता स्मरण नुरावे  एकटे उरावे शून्यामाजी ॥२ नाचता नाचता नर्तन ...