शनिवार, १४ जून, २०१४

तशी भूल जीवास सखी







तशी भूल जीवास सखी 
सदैव पडत असते  
चटका बसता पाऊल    
सावली शोधत असते

गैर नसले तरी सारे 
इथे अवघड असते
जुगाऱ्याला जगण्यासाठी   
नवा डाव नशा असते

मातीचाच देह असतो  
माती काही सुटत नाही
रुजतांना सुकलो तरी
जीवनेच्छा मिटत नाही

कुठलीशी ओली झुळूक
श्वासालाही जाग आणते
मरता मरता रोपटे
हात नभात पसरते

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...