सहज सकाळी सखी
पुनरपि येताच तू
बहरूनी वृक्षावरी
पुन्हा आले नवे ऋतु
दाटुनी गर्द मेघांनी
आकाश लागले झरू
दु:ख मिटुनी पाखरे
मनी लागले उतरू
तुझे हास्य कणोकणी
देही लागे वीज नाचू
आनंदाने एक गीत
शब्द लागतात रचू
जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
प्रिय बाबासाहेब *********** कृतज्ञतेच्या किनाऱ्यावर येवुन तुम्हाला करतो आहे मी अभिवादन कुठलाही रंग कुठलाही झेंडा हातात घेतल्...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा