जेव्हा तू
म्हणालीस
दूर मी जाणार
आहे
नवे क्षितीज
नवे आकाश
खांद्यावरी
घेणार आहे
एक पोकळी
अवकाळी
माझे मन
व्यापून गेली
निराधार अन वावटळी
जाणिव क्षणात होवून
गेली
बंध अजून
नव्हते जुळले
तरीही काही
तुटत गेले
मावळले शब्द
माझे
तुटक हुंकार
फक्त उरले
तू स्वप्नांना
उलगडतांना
एक नवे चित्र
काढले
माझे तेव्हा
मला दिसले
रंग सारे
मावळलेले
थोपटले मी मनास
माझ्या
आणि तुजला
म्हटले
जा पुढे सदा जीवनी
पण
जुने पाहिजे
का सुटले ?
विक्रांत
प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा