शनिवार, २८ जून, २०१४

मेंदी जरा अजून रंगू दे






नाजूक तुझ्या हातावरली
मेंदी जरा अजून रंगू दे
कुठल्या वेड्या खुळया जीवाची
प्रीत जरा अजून रंगू दे

थोडी जुनाट बेलबुटीही  
ना आवडली तरी राहू दे
नक्षीहून खुलणे मेंदीचे
सखी जगाला जरा पाहू दे

कधी तरी मग ते मेंदीचे
हात हातात अलगद दे
तनामनातील प्रेमवीणा
मुक्तपणे अन झंकारू दे

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

द्वेष

द्वेष  **** मुळात माणसे द्वेष का करतात? द्वेष  करणे ही मनाची  माणसाची गरज आहे का? हा माणसाच्या मनाचा  अविभाज्य भाग आहे का? द्वेष...