शुक्रवार, १ डिसेंबर, २०२३

निभ्रांत





निभ्रांत
******

शोधावे कुणाला भेटावे कुणाला 
ठेवावे कुणाला हृदयात ॥१

भजावे कुणाला त्यजावे कुणाला 
म्हणावे कुणाला जिवलग ॥२

स्मरावे कुणाला नमावे कोणाला 
धरावे कुणाला अंतरात ॥३

ऐसीया प्रश्नात असता धावत 
जन्म हरवत जात उगा ॥४

तेधवा श्री दत्त प्रकटे मनात 
स्वामी समर्थ भगवंत ॥५

करुनी  निभ्रांत ठेवी भ्रूमध्यात 
आणून विक्रांत सहजीच ॥६

हरवले मन हरवले ध्यान 
जाणीव संपूर्ण पै शून्यात ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दरवळ

दरवळ  ******* शब्द काही दिलेस मला  तू  रांगोळीत रंग भरतांना  अन् स्वप्न नव्या जगण्याचे तम प्रकाशी विरघळतांना ॥ थरथरले मृदू ओठ तु...