गुरुवार, १४ डिसेंबर, २०२३

साथ

साथ
*****

सोडुनिया हात आता तू कुणाची 
सोडुनिया साथ आता तू स्वतःची ॥१

नव्हती कधीच गाठ बांधलेली 
चालता प्राक्तनी गाठ पडलेली ॥२

कुणाचे असे हे काही देणे घेणे 
तयालागी इथे असे हे भेटणे ॥३

घडे भेटणे नि घडे हरवणे 
उमलून कळी फूल ओघळणे ॥४

परी जाहले हे गंधित जगणे 
जाणुनिया वृक्ष उभा कृतज्ञतेने ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

साद

साद ***** माझ्या मनातील माती मज आभाळ मागते ती दलदल रोजची थोडी कोरड मागते लाखो पाऊले मनात नीट मोजता ना येते  पाणी भरले खळगे कुणी ...