निरोप
******
वन्ही धडाडला आकाशात ॥१
वाजे पडघम तुतारी सनई
मिलनाची घाई बहू झाली ॥२
उधळली फुले रांग तोरणाची
रंन्ध्र सुगंधाची घर झाली ॥३
झगमगू आले सप्तरंगी दीप
अरूपात रूप मावळले ॥४
जरी घडीभर विरह वेदना
किती जीवघेणा काळ वाटे ॥५
विक्रांत पिकल्या फळा देठ झाला
पडला राहिला कुणा ठाव ॥६
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com .
☘☘☘☘
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा