मंगळवार, ५ डिसेंबर, २०२३

कृपा


गिरनार परिक्रमा ३
***************

इवलाली कृपा आकाश होऊन 
माझिया मनात आली ओघळून ॥१
सहज घडले असे जे वाटते 
सहज परि ते कधीच नसते ॥२
विश्वसुत्रधार सांभाळतो भक्ता 
अनन्य शरण  तया पदा येता ॥३
तयालागी असे भक्तांचे व्यसन 
कळू कळू आले संतांचे वचन ॥४
पाहता वळून दिसे त्याच्या खुणा 
घेई उचलून पदोपदी देवराणा ॥५
देता हेतूविन तया प्रेम कणभर 
जहाला देव तो सुखाचा सागर ॥६
अगा विश्वंभरा कृपा सरोवरा 
ठेवी सदोदित मज तुझ्या दारा ॥७
हरखुन भाग्य पाहतो विक्रांत 
तयाच्या प्रेमात सुखाने डोलत ॥८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माऊली

माऊली ******* तुझ्यापायी काही घडो हे जगणे  ज्ञानाई मागणे हेच आहे ॥१ सरो धावाधाव मागण्याचा भाव  अतृप्तीचा गाव तोही नको ॥२ अर्भकाच...