रविवार, २४ डिसेंबर, २०२३

अट्टाहास


अट्टाहास
*******
आमचा भक्तीचा 
जरी अट्टाहास 
राहून उदास पाहू नको ॥१
रोजचा याचक 
तुझिया दारचा 
दोन रे घासाचा भुकेला हा ॥२
आशाळभूत हे 
जरी असे मन 
प्रारब्ध वाचून काय मिळे ॥३
तुझिया नियमा
तू न बांधलेला 
म्हणूनया गोळा धाष्टर्य केले   ॥४
विक्रांत प्रवासी 
जन्ममरणाचा 
विसावा घडीचा देई दत्ता ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ज्ञानाई

ज्ञानाई  ****** तुझिया मनीचे घाल माझे मनी  ज्ञानाई जीवनी कृपा करी ॥१ कळू देत भक्ती अहंभावातीत  भाव शब्दातीत उरो मनी ॥२ जडू देत म...