यात्रा
******
माय मी मनी या दत्त धरीयला दत्ताच्या वाटेला जाऊ दे ग मला ॥१
फुलांचा ताटवा नाही त्या पथाला
ठाई ठाई किंवा वृक्ष सावलीला ॥२
होय थोडे कष्ट पाही तो परीक्षा
घाली समजूत देई काही शिक्षा ॥३
गुरु आहे तो ग सारे ज्ञाता दाता
करी मज तया दारीचा वसौठा ॥४
संसाराच्या लळा लावू नको आता
हलकेच निघो फळ सोडो देठा ॥५
अवघे सुंदर नच संपणारे
जगत तुझे घट्ट बांधणारे ॥६
हलकेच सैल कर तुझी मिठी
सोड तया गावा दाविला तू दिठी ॥७
भगवती तुझ्या करुणे वाचुनी
अंतर्यात्रा नच येईल घडून ॥८
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com .
☘☘☘☘ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा