निर्व्याज
******
तुझे चाफेकळी नाक हनुवटी निमुळती
गर्द डोळीयात दिसे डोह यमुनेचे किती १
केस मोकळे विजेचे देती आषाढा आव्हान
मुक्त हसण्याला अन् शरदाचे वरदान २
येते समोरून जेव्हा गाणे मनात सजते
आसमंती दरवळ फुल फुल उधळते ३
कुणी म्हणते तू तेज तीक्ष्ण असे तलवार
कुणी म्हणते शितळ गंगाजळ सर्वकाळ ४
जरी जाणतो न तुला तरी गमे ओळखीची
माझ्या मनात प्रतिमा कुण्या मागील जन्माची ५
तुला सांगू आणि काय रहा अशीच हसत
तुझे निर्व्याज हसणे राहो मनी खळाळत ६
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com .
☘☘☘☘ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा