जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
गुरुवार, १२ सप्टेंबर, २०१९
मंगळवार, १० सप्टेंबर, २०१९
शोधाच्या रिंगणी
शोधाच्या रिंगणी
फिरे गरगर
गळ्यातला दोर
सुटे चि ना
मारतो हिसके
कधी आवेशाने
अधिक तयाने
फास बसे
बसले जे उंच
तुजला जाणून
तयाला पाहून
हेवा वाटे
आहा पुण्यराशी
भाग्याचे पाईक
देवा सोयरीक
केली ज्यांनी
अन् आम्ही कैसे
असे भाग्यहीन
सुटेना रिंगण
दावण ही
विक्रांत घाण्याला
रोज मरे मरे
दत्ता तुज स्मरे
सोडव रे
डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
सोमवार, ९ सप्टेंबर, २०१९
दत्ताई
दत्ताई
******
कृपेची मागणी
माय तुझ्या दारी
दाटल्या अंधारी
दीप होय ॥
प्रेमाचे गा-हाणे
माय तुझ्या गळा
ओत ग जिव्हाळा
सर्व काळी॥
मूढ मी बालक
धावे सैरावैरा
देई ग आसरा
पदराचा ॥
भक्तीचा भुकेने
झालो ग व्याकूळ
मिटेना काहूर
अंतरीचे ॥
असुनी जगाची
तू ग स्वामींनी
भिकारी होऊनी
जगतो मी ॥
इतुका असे मी
काय भाग्यहीन
अनाथ म्हणून
मिरवितो ॥
म्हणतो विक्रांत
ये गं ये दत्ताई
उचलून घेई
कडेवरी ॥
रविवार, ८ सप्टेंबर, २०१९
तुझी आठवण
किती विलक्षण
मजला सोडून
जात नाही ॥
मनी भरलेले
झुकलेले डोळे
स्मरणी भिजले
येत राही ॥
तुझे बोलावणे
तुझे थांबवणे
तुझे ओढावणे
मुग्ध किती ॥
धुक्यात दडले
दवात सजले
अर्थ नसले
वेडे गाणे ॥
तरीही म्हटले
देही आसावले
अतृप्ती सजले
अतृप्ती सजले
पुन्हा पुन्हा ॥
जरी आता नाही
घेणे गाठी भेटी
मन तळवटी
फुलांची तू ॥
००००००
© डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.in
https://kavitesathikavita.blogspot.in
दत्त दिसो मज
दत्त दिसो मज
भरला जगात
अवघ्या रूपात
नांदणारा ॥
दत्त स्मरणात
जाऊ माझा दिस
विषयाचे विष
स्पर्शू नये ॥
नांदावा सकल
संतांचे संगती
उलटून दिठी
पाहण्याची ॥
वाहती प्रवाह
तमाचे भ्रमाचे
व्हावे नच त्यांचे
कधी काळी ॥
आणखी विक्रांता
नलगेच काही
सदैव तू राही
हृदयात ॥
© डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.in
https://kavitesathikavita.blogspot.in
शनिवार, ७ सप्टेंबर, २०१९
. . .ना चि
. . .ना चि
**********
त्याचे प्रश्न तिला
तिचे प्रश्न त्याला
उत्तर कोणाला
सुचेनाचि
आवडला खेळ
निसटली वेळ
परी ताळमेळ
लागेनाचि
काही देहावरी
काही मनावरही
सुखाच्या लहरी
थांबेनाचि
कळेल जगाला
घराला दाराला
शब्द बोलण्याला
धजेनाचि
इतकाच काळ
इतकाच वेळ
मन रानोमाळ
थांबेनाचि
निरोपी भिजले
शब्द ओठातले
हात हातातले
सुटेनाचि
आजचा उद्याला
देऊन हवाला
प्रश्न जडावला
मिटेनाचि
०००००००
© डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.in
https://kavitesathikavita.blogspot.in
शुक्रवार, ६ सप्टेंबर, २०१९
दत्ता येई रे
दत्ता येई रे
मज पाही रे
पदी देई रे
ठाव आता ॥
कर घाई रे
वेळ नाही रे
प्राण जाई रे
मम आता ॥
जन्म सरला रे
यत्न चुकला रे
देह थकला रे
भवरोगी ॥
नच लायक रे
मूर्ख बालक रे
तरी दुर्लक्ष रे
करू नको
घट फुटू दे रे
नभ सुटू दे रे
प्रश्न सुटू दे रे
मुळ रुपी ॥
येई धावत रे
कृपा विक्रांत रे
असे मागत रे
स्मर्तृगामी
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
०००००००
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
हट्ट
हट्ट *** हाच हट्ट माझा पुरा करी देवा यावे भक्तीभावा फळ माझ्या जाणतो कोरडा तूप तेलाविन आलो मी घेऊन नैवेद्य हा फुले बाजाराची...
-
अधिक देखणे तरी निरंजन पाहणे भावार्थ ******************************** अधिक देखणे तरी निरंजन पाहणे योगीराज विनविणे मना आले वो माय...
-
गणित ***** गणित या जगताचे नाही कुणास सुटत सारे आकडे अस्थिर नाही कुणास कळत जगी कुणी फुशारतो पुण्य राही मिरवत दिसे तो ही सापडला...
-
येणेजाणे ******* आता येणे घडू नये उडणाऱ्या पाखराला आता देणे उरू नये पराधीन फकीराला ॥ देह काळा बांधलेला क्षणोक्षणी वाहू गेला कुठ...
-
हट्ट *** हाच हट्ट माझा पुरा करी देवा यावे भक्तीभावा फळ माझ्या जाणतो कोरडा तूप तेलाविन आलो मी घेऊन नैवेद्य हा फुले बाजाराची...
-
झाकलिया घटीचा दिवा । नेणिजे काय झाला केधवा । यारीती जो पांडवा । देह ठेवी ...ज्ञानेश्वरी मरण ***** असे हवे रे सुंदर मरण ज्यात ओघळून जाईल ज...
-
शून्य **** मनाच्या गाभारी प्रगटले शून्य जन्म प्रश्नचिन्ह पांघरले ॥१ मोडले पडले इमले बांधले स्वर्गावरी गेले स्वप्न वेडे ॥२ वात ...
-
मागतो मी ******** माझ्यासाठी तुझ्याकडे नच काही आराखडे जाणतो मी थकलेला रुढार्थाने सारे कसे इथे जीणे छान असे पाहतो मी भोगलेला ह...
-
तू गेल्यावर ********* असणे तुझे जीवनाला अवघे व्यापून होते प्रेमानुबंध क्षणाक्षणाला सदैव बांधून होते प्रेमवृक्ष तू आयुष्यात माझ...
-
वाट ***** कैसी धावे वाट दिशाहीन अशी होऊनिया पिशी मुक्कामाच्या ॥ सारे सुख जरी बाजू घुटमळे सुमनांचे मळे सजलेले ॥ वाटेला वाटेचे...
-
देव देश अन धर्मासाठी ********** जन्म देवासाठी जावो हा सगळा भावभक्ती मळा फुलो सदा ॥ देह देशासाठी जावो हा सगळा ...






