भक्ती दीप
*******
देई सुख तया जयास ते हवे मज न ठकावे दत्तात्रेया ॥
देई धन तया जया त्याचे मान
मज गुणगान गाऊ दे रे ॥
नको बांधू देवा उरी या पाषाण
सोन्याचा म्हणून भुलवून ॥
नको मज स्तुती मित्र तेरे स्वार्थी
वहावा ही खोटी कामासाठी ॥
जग विसरावे अंतरी पहावे
स्वरूपी राहावे ऐसे व्हावे ॥
जन्म मरणाच्या लाख लाख वाटा
रहावा पेटता भक्ती दीप ॥
विक्रांत तुझिया प्रेमा आसावला
देह हा अर्पिला पायी सदा ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘☘
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा