वाममार्ग
*******
दोनचार या पैशासाठी ईमान विकू नका कुणीपचेल तोवर पचेलही मग घाला घालीन कुणी ॥
चोरावरती मोर होऊनी नका करू आत्मवंचना फेडावे ते लागेल कधी त्यातून सुटका नच कुणा ॥
कमवायला वरचा पैसा अधिकारीही बनतो कुणी त्याहून प्रशस्त राजमार्ग आक्रमितो राजकारणी ॥
हा पैसा जनता नि देशाचा कुण्या इमानी हाताचा
काढून घास घासा मधला वाटा दिधला सरकारचा
चवली त्यातली खाऊ नका नरक द्वार उघडू नका
सांगे कळकळीने विक्रांत वाम मार्गास लागू नका ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘☘
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा