गिरनार जग
*********
असे वेगळे रे जग ते वेगळे परी पाहिजे रे तेथ तू चालले ॥
पळू पळू वर प्रेमे येई जरा
वळू वळू मागे पायरी उतारा ॥
डोळ्यात मुर्त धरा पादुकांना
क्षण भेट ठेवा खोचूनिया मना ॥
दुखतील पाय होय गैरसोय
घेई मजा तीही नको रे उपाय ॥
जर कोणी साथ दत्तभक्त भला
काय वर्णू मग तया त्या भाग्याला ॥
भाव द्विगुणित मग एक एरा
होय बोलणारा तोही ऐकणारा |
भेटेल दत्त रे भेटेल खचित
धरू नको शंका मनात किंचित ॥
कळेल ते रूप नच वा कळेल
आशिष खुण ती हृदी उतरेल ॥
होईल परीक्षा तिथे तुझी काही
झालास तर हो सुखे नापासही ॥
परी लिहिणारा तोही एक शेरा
घडे संग त्याचा क्षण एक जरा ॥
हे रे काय कमी असे या जीवाला
दत्त जडलेला राहो जगण्याला ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘☘
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा