जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
बुधवार, २२ जानेवारी, २०१४
सोमवार, २० जानेवारी, २०१४
वीणा निर्भया आता इस्टर
वीणा निर्भया आता इस्टर
कसे कधी हे चक्र थांबणार
नरा नरात लपलेला हा
पशु कधी दूर हटणार
प्रत्येक स्त्री मादी असते
मिळाली तर हवी असते
वखवखलेल्या हवेपणाला
पोर कुणाची का न दिसते
राणी हाती सत्ता यावी
मुंग्यांची मग सेना व्हावी
स्त्रीसत्ताकी त्या हुकुमातून
घडेल काही अथवा नाही
रविवार, १९ जानेवारी, २०१४
भेट
आता तर गोष्ट आपुली
इथवर
येवून आहे ठेपली
आलीस
तू अन गेली
मी
चौकशीही न केली
नाही
तसे सारे काही
विसरलो
मी अजुनी नाही
स्मृतीचेच पण
सांगाडे ते
जीव त्यात
आता नाही
डोळ्यामध्ये
तुझ्या पाहिले
भाव पाटी
स्वच्छ पुसले
नव्हती
त्यात ओळख कुठली
नव्हतेच
जणु घडले काही
मग तो
शिक्का सरकारी
ठपकन कागदावरी
मारुनी
नेक्स्ट
कोरडे तुज म्हणुनी
दूर सारीले
मी नजरेपासुनी
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
तू गेल्यावर
तू गेल्यावर ********* असणे तुझे जीवनाला अवघे व्यापून होते प्रेमानुबंध क्षणाक्षणाला सदैव बांधून होते प्रेमवृक्ष तू आयुष्यात माझ...
-
शांताराम महाजन सिनीअर फार्मासिस्ट निवृत्ती दिना निमित्त . ************ मुंबई महानगरपालिकेत काही भाग्यवान विभाग आणि कर्मचारी आ...
-
अधिक देखणे तरी निरंजन पाहणे भावार्थ ******************************** अधिक देखणे तरी निरंजन पाहणे योगीराज विनविणे मना आले वो माय...
-
शून्य **** मनाच्या गाभारी प्रगटले शून्य जन्म प्रश्नचिन्ह पांघरले ॥१ मोडले पडले इमले बांधले स्वर्गावरी गेले स्वप्न वेडे ॥२ वात ...
-
विठ्ठल दर्शन (आषाढी) ***************** पाहिला मी देव उभा विटेवर सावळा सुंदर मनोहर पाहिला ना वेष नच वा मुकुट चंदनाचा नीट गंध उभ...
-
चांदण्याचे तळे ************ पंचतत्वाचाच देह पुन्हा पंचतत्वी गेला पाश माया ममतेचा एक तुटूनिया गेला पाश घरातले सारे तया घ...
-
जगदीश महाराज (झगडीया मढी) नर्मदाकाठच्या कविता *************************** निर्मळ डोळ्यांचा मधुर वाणीचा नर्मदा तीरीचा साधू एक ...
-
१५ ऑगस्ट निमित्त -भारत देशास ************************** हे माझ्या सुंदर देशा तुझ्यासाठी मी फारसे काही करू शकलो नाही. घरदार संस...
-
समाधान ******* असे समाधान थेँब अमृताचा प्राण साधनेचा साधकाच्या ॥१ समाधानाविना येथे येते न रुजून ध्यान हे सजून अंतरंगी ॥२ शांती...
-
कर्म **** कर्मात गुंतला काय व्यवहार अनंत अपार जीवनाचा कर्मातून कर्म घडतसे जन्म दिसे अंतहीन प्रवास हा थांबू म्हणूनही थांबता य...
-
तुझे डोळे ***** तुझे डोळे चांदण्यांचे बावरल्या हरीणीचे दूर कुठे अडकल्या गायीच्या गं दावणीचे . तुझे डोळे नवाईचे घनदाट...


