सोमवार, १३ जानेवारी, २०२५

देव

.देव
***
नाना रुपी देव नाना ठाई वास 
परी साध्य होतो कळे गूज त्यास ॥

अवघा पसारा तयाच्या मायेचा 
असा बहुरूपी कोणा कळायचा ॥

करू जाता यत्न तया शोधण्याचे 
गुह्य होत जाते स्वरूप ज्ञानाचे ॥

सगुण निर्गुण वादाचे कारण 
किती एक मार्गी होते भटकणं ॥

सर्व काही तोच तयाला भजावे 
जाणतो विक्रांत हृदयी धरावे ॥

मूर्ती मूर्तीतून तोच प्रकाशतो 
येशु बुद्ध कृष्ण दत्त माझा होतो ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ -

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

निवडूंग

निवडूंग ****** स्वार्थाच्या पायरीवर जेव्हा  उभी राहतात माणसं आणि मिळालेल्या क्षणाचं  रूपांतर करू पाहतात फक्त फायद्यात स्वार्थात ...