असणे
*****
माझ्या असण्याचे गाणे जेव्हा होईल नसणे
तेव्हा घडेल गवसणे
दत्तात्रेया तुझे ॥
जैसे सदा सर्वकाळ
व्यापुनिया आभाळ
राहते ते सलील
दिसल्याविना ॥
सदा असून नसणे
सदा नसून असणे
अगा असे हे खेळणे
तुझे कौतुकाचे ॥
हा असा नाहीपणा
'नाही उर्मीच्या विना
माझ्या उरावा अंगणा
जाणीवेच्या ॥
गूढ जरी मी जाणतो
तव वर्म समजतो
सारे तुच रे करतो
सर्वातीता ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️ -
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा