गुरुवार, ३० जानेवारी, २०२५

कुंभमेळा व बळी

कुंभमेळा व  बळी
*****************
कुठलाही धर्म कुठलेही कर्मकांड 
जीवाहून मोठे नसते.
पण नीट पाहिले तर कळते 
प्रत्येक श्रध्दा ही अंध श्रद्धाच असते.
ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे 
संस्कारा प्रमाणे ती आकार घेते.
ज्या श्रध्देने देश धर्म समाज 
आणि व्यक्तीचे अहित होते 
ती त्यागणे श्रेयस्करच.
हे एक सत्य आहे की 
इथे व्यवस्थापन अपुरे पडले.
पण कोट्यवधी लोकांना सांभाळणे 
तेवढे सोपे नसते
प्रत्येक यात्रेत जत्रेत 
अफाट गर्दी होत असते
त्यात मध्ये चेंगराचेंगरी 
होण्याची शक्यता असते
जिवलग हरवण्याची शक्यता असते .
तरीसुद्धा या जत्रांची गर्दी कमी होत नाही 
याचे काय कारण एकच असते
देहामनापर नेणारे क्षितिज 
त्यांना तिथे खुणावत असते .
अस्तित्वाचे नग्न सत्य भूल घालत असते.
त्यांच्यासाठी ते स्वप्न 
जीवावर उदार व्हावे एवढे अफाट असते.
चेंगराचेंगरी मध्ये मरण तर कुठेही येत असते 
ते दादरच्या परळच्या पुलावर येत असते 
आणि कुंभमेळ्यातही येत असते 
पण ते शेवटी एका अपघाताचे फलित असते 
तिथे श्रद्धा अंधश्रद्धचे नाते नसते.
🌾🌾🌾
 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दारात

दारात **** तुझ्याच कृपेने जळेल वासना  सांभाळ सावर मज दत्त राणा ॥१ जुनाट घोंगडे क्षणात जळेन  मग ते भस्म मी तुजला वाहीन ॥२ फारच कठ...