सोमवार, ६ जानेवारी, २०२५

लायक

लायक
******
जाणतो मी माझे मन काळे दत्ता 
स्तुती आइकता खंत वाटे ॥१
तेच दाटलेले मोहाचे आभाळ 
डोळ्यात काजळ अनुरागी ॥२
तीच ती आसक्ती सदा भुलविते 
वाट चुकविते वारंवार ॥३
चाले पथावर तुझ्या हेच सुख 
चालती अनेक भाग्यवंत ॥४
त्यात मी एक जाणतो पतित
पथ आक्रमित वाटसरू ॥५
येथ चालण्याला करी रे लायक 
भेटीचा चातक चित्त शुद्ध ॥६
विक्रांत पेटारा काम क्रोध भोगी
रिता कर वेगी दत्तात्रेया ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दार

दार **** माझ्या मना बंद कर  दार खिडक्या हजार  लाख दृश्य जगताची  किती फसशील बरं ॥१ दिसण्याला अंत नाही  प्रकाशाची येरझार  बघ निहाळ...