*******
प्रीतीच्या कवणा प्रीतीचा अंकुर फुटल्या विना न येतो रे बहर ॥
अन्यथा विझतो हरेक निखारा
राखेचा आणिक उरतो ढिगारा ॥
भक्तीच्या कवणा भावना तरंग
मिळताच येती भक्तीला रे रंग ॥
अन्यथा पाखंड कोरडा वेदांत
जीवना वाचून वठलेले झाड ॥
शौर्याच्या कवणा देशाभिमान
यावच लागतो मनात दाटून ॥
अन्यथा निरस पगारी कविता
जन्मास येते रे नसलेला आत्मा ॥
विक्रांत जगणे जीवना कारण
कळल्या वाचून अवघे सरण ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा