- दादा गावंड यांची कविता (अनुवाद) edited*******************मन हे भटकते तया भटकू देराहुनिया शांत तया पाहून घे ॥१बाहेर धावून करी ते व्याकूळपरी स्तब्ध रहा अंतरी निश्चळ ॥२राहू वाहू दे हे मन नि विचारव्यस्त सदोदित आणीक अपार ॥३जाणीव निश्चल अलिप्त नि शांतआपुलिया आत सदा अखंडित ॥४सौर्य मंडलास सदैव भ्रमणसूर्य परी राही ढळल्या वाचून ॥५धावू दे इंद्रिय इंद्रियाच्या अर्थीहोवो कासावीस मन मेटाकुटी ॥६परंतु ती ऊर्जा असू दे अलिप्तधावू देत मन निरखी त्या शांत ॥७फुटतात लाटा अनंत वरतीअंतरी सागरा गांभीर्य नि शांती ॥८भटकती मेघ सर्व जगतातपरी आकाश ते पवित्र निस्तब्ध ॥९घटती घटना घडो जीवनातराही अंतरी तू सावध निवांत ॥१०बडबडे मन सदैव बेशिस्तठेव आकलन शांत मी दुरस्थ ॥११प्रखर प्रदग्ध पाहणे घडताशांती व नम्रता उलगडे चित्ता ॥१२अरे तू आकाश असीम अनंतनच पसरले मेघ अस्ताव्यस्त ॥१३सावध सुधीर संवेदनशीलआहेस तू साक्षी तुच जाणशील ॥१४क्षणिक स्मृती नि क्षणिक विचारनाहीस रे तू जाण हे साचार ॥१५सखोल गंभीर प्रचंड सागरतरंग ना तू जो दिसे वरवर ॥१६असेअविचल सूर्य तू महाननच उपग्रह विचार भ्रमण ॥१७तूच तूच आत शाश्वत नि स्थिरविनाशी ढसाळ दिसे जै बाहेर ॥१८अनंत अव्याप्त असा जो शाश्वतअजन्मा प्राचीन असा तू रे फक्त ॥१९तत तत्व असी तूच असे तो रेतत तत्व असी तूच असे तो रे ॥२०तुझ्यातील ते हे सदा तुझे व्हावेजाणीवी जाणीव सारे उजळावे ॥२१कालाच्या अतीत दिव्य अनुभूतीअक्षय अवीट यावी तुझे हाती ॥२२मूल्यवान अशी घटिका ही आहेमूल्यवान क्षण आताचाच आहे ॥२३करी हे चिंतन धरी रे तू ध्यानघेई तू जाणून आपल्या आपण ॥२४दिव्य ते आपले अंतर जाणूनशाश्वत नित्य घे स्वरूप पाहून ॥२५🌾🌾🌾© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणेhttps://kavitesathikavita.blogspot.com
- स्तब्ध रहा तू रे निष्चल
जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
मंगळवार, २८ जानेवारी, २०२५
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
दारात
दारात **** तुझ्याच कृपेने जळेल वासना सांभाळ सावर मज दत्त राणा ॥१ जुनाट घोंगडे क्षणात जळेन मग ते भस्म मी तुजला वाहीन ॥२ फारच कठ...

-
नेमिनाथ देरासरी *************** नेमीनाथ देरासरी होता ऊर्जेचा सागर खाली नमिता श्रद्धेने माझी भरली घागर ॥ मूर्त उदार गंभीर लखलखीत ...
-
झिंग ***** चुकार डोळे गर्द सावळे नच कळती रे कुठे गुंतले यंत्र हातात गुपित ओठात कोण चालले शोधत एकांत आणिक चाहूल लागता जरा का ...
-
तुझे डोळे ***** तुझे डोळे चांदण्यांचे बावरल्या हरीणीचे दूर कुठे अडकल्या गायीच्या गं दावणीचे . तुझे डोळे नवाईचे घनदाट...
-
डॉ.उमेश देशपांडे ********** मला वाटते उमेश देशपांडे हे एक नाव नाही एक व्यक्ती नाही तो एक जीवन जगायचा एटीट्यूड आहे जीवन आनंदा...
-
भाग्यवान ******** सुटूनिया लोभ भय हरवावे सुखही कळावे मोहमयी ॥१ चालावे उदास कळून जीवास सांडून सायास सुरक्षेचे ॥२ हवाय कुणाला जम...
-
दारात **** तुझ्याच कृपेने जळेल वासना सांभाळ सावर मज दत्त राणा ॥१ जुनाट घोंगडे क्षणात जळेन मग ते भस्म मी तुजला वाहीन ॥२ फारच कठ...
-
जगून खूप झालय जीवना फूट आता मरून जातो ओझे वाहून थकलो तुझे पुरे आता फेकून देतो तुझी उष्टी सुखं किती ओरपून...
-
खेळ हवे पणाची ओढ विलक्षण कळल्यावाचून प्राण व्याकूळ || कधी सुखाची गूढ हुरहूर अथवा काहूर दु:खाचेही || ये अं...
-
चित्र **** पुन्हा तुझे चित्र दिसे पानावर पुन्हा एक हास्य आले ओठावर पुन्हा एक श्वास झाला खालीवर पुन्हा एक तार तुटे...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा