बुधवार, ८ जानेवारी, २०२५

तुज स्मरता

तुज स्मरता
*******
तुज स्मरता स्मरता माझा सरला एकांत 
स्मृती एकेक लाघवी आली फुलून मनात 

झाले आकाश कुसुंबी रूप भरले दिशात 
किती न्याहाळू कुणाला मन विखुरे कणात 

तूच चंद्र सूर्य तारे तूच तेज गंध वारे 
स्पर्श रोमरोमी निळे माझे अस्तित्व थरारे 

शुभ्र पुनवेची रात्र कृष्ण झावळ्या नाचऱ्या 
पाना पानावर किती तुझ्या मोहक सावल्या 

लाटा मंथर पाण्यात रव इवला खळाळ
ओली पाऊले वाळूत आणि थांबलेला काळ 

नुरे अस्तित्व हे माझे गेले विरून तुझ्यात 
गूढ तृप्तीचा हुंकार माझ्या उतरे देहात

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

तुज स्मरता

तुज स्मरता ******* तुज स्मरता स्मरता माझा सरला एकांत  स्मृती एकेक लाघवी आली फुलून मनात  झाले आकाश कुसुंबी रूप भरले दिशात  किती न...