गुजगोष्टी
*******
कुणा फळले जन्म इथले जगून मेले जग सरले १
तरीही स्वप्ने जगती त्यांची
काही उद्याची काही कालची २
रे भानावर ये लवकर
काही खरे ना मुक्कामावर ३
हित तुझे रे तुझ्याच हाती
तुटू सुटू दे आतील गाठी .४
फक्त कळावे याच कारणे
जन्म जीवन व्हावे वाहणे ५
शब्द भरणी गातोय काही
गळाखरड ही फुकट नाही ६
जळे काहूर आत अपार
खरेच बाता नाहीत यार ७
कळो तुजला खुणा त्यातल्या
गुजगोष्टी ज्या हृदयी लिहिल्या ८
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा