निरोप
*****
अटळ असतात निरोप काही जीवन वाहत असता प्रवाही
कधी सुटतात सखे जिवलग
कधी तुटतात प्रिय नातलग
नसूनही इच्छा देण्यास निरोप
दुरावले जाती पथ आपोआप
किती खेळगडी किती सवंगडी
निरोप घेऊन सुटू जाते गाडी
असंख्य निरोप खोल अंतरात
वियोगाचे अश्रू राहती ढाळत
पुन्हा पुन्हा स्मृती मनी उजळत
स्वप्न भेटण्याची राहते पाहत
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा