शनिवार, ११ जानेवारी, २०२५

दत्त बोलावतो

दत्त बोलावतो
**********
दत्त बोलावतो 
पदावरी घेतो  
आशिष ही देतो 
स्व भक्ताला ॥
थोडीशी परीक्षा 
कसोटी ही घेतो 
सोने तापवितो 
मुशीमध्ये   ॥
लेकरू चुकते 
वाट हरवते 
माय त्या शोधते 
बरोबर  ॥
कडी कडी जोडे 
भक्त भक्ता भेटे 
तयासाठी पडे 
गाठी काही ॥
गूढ हे तयाचे
चालले खेळणे 
कश्याला कळणे 
हवे कुणा ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

संगीता देशपांडे

संगीता देशपांडे ( निवृती दिन )  ************ मोगरा पाहिला की मला  दोन व्यक्तींची प्रकर्षाने आठवण येते  एक म्हणजे ज्ञानेश्वर माऊल...