देव लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
देव लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ३० जुलै, २०२६

आधार

आधार
******
देव का रे कोपतो हा
रागावून कुणावरी 
देव का रे धावतो हा
आपल्या त्या कुणासाठी 

देव का रे राखतो हा 
दुजा भाव मुलांसाठी 
जर ऐसे घडे तर
देवपण कश्यासाठी 

माणसांनी भोवतली 
जणू जाळे विणले रे
अडकलो मी म्हणुनी 
पाही त्राही करती रे 

हवा का मनास देव 
त्याचे त्यास नच कळे
प्रश्न चिन्ही अस्तित्व हे
नि तर्क सारे पांगळे 

आणि वाटा लाख इथे 
धावण्यास सैरा वैरा 
अंत हिन प्रवाहाला
नच दिसतो किनारा 

डोळसाचे भान वेडे
अंतरात खिळलेले 
देवपण असो नसो 
आधार ते सोडलेले 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 






सोमवार, १३ जानेवारी, २०२५

देव

.देव
***
नाना रुपी देव नाना ठाई वास 
परी साध्य होतो कळे गूज त्यास ॥

अवघा पसारा तयाच्या मायेचा 
असा बहुरूपी कोणा कळायचा ॥

करू जाता यत्न तया शोधण्याचे 
गुह्य होत जाते स्वरूप ज्ञानाचे ॥

सगुण निर्गुण वादाचे कारण 
किती एक मार्गी होते भटकणं ॥

सर्व काही तोच तयाला भजावे 
जाणतो विक्रांत हृदयी धरावे ॥

मूर्ती मूर्तीतून तोच प्रकाशतो 
येशु बुद्ध कृष्ण दत्त माझा होतो ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ -

१५ ऑगस्ट निमित्त -भारत देशास

१५ ऑगस्ट निमित्त -भारत देशास ************************** हे माझ्या सुंदर देशा  तुझ्यासाठी मी फारसे काही करू शकलो नाही.  घरदार संस...