प्रथमेश
******
निर्गुणी उदेला देव प्रथमेश रुप हे विशेष घेऊनिया ॥ १
पंचतत्व मेळा जाहला रे गोळा
जणू आले खेळा शून्यातून ॥ २
उमटला शब्द निर्वाती प्रणव
जाहला प्रसव जगताचा ॥ ३
रूप रस गंध ठाकले सकळ
जाहवे सफळ जन्मा येणे ॥४
महासुखा आले दोंद आनंदाचे
नाव ते नाहीचे उमटेना ॥५
पाहुनिया मूर्त कल्पना अतित
विक्रांत चकित वेडावला ॥६
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com .
☘☘☘☘ ,🕉️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा