आश्चर्यवत
**********
एक गीत माझ्यातूनहळू आहे झंकारत
ढोल ताशे झांजा वीणा
जात आहे मंदावत
किती शब्द किती ओळी
मनी आहे रेंगाळत
तुझ्यामुळे जीवनाला
धुमारे आहे फुटत
शाखाशाखी फुले आता
देह जणू पारिजात
बहरला जन्म सारा
गंध धुंद अंतरात
मिटलेली स्वप्न सारी
डोळे तृप्त चांदण्यात
हरवली तृषा सारी
जीव झाला हा निवांत
जाणवले स्वप्न कुणी
उभे घेऊनी हातात
खरे न वाटून सारे
मी स्तब्ध आश्चर्यवत
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com .
☘☘☘☘
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा