बुधवार, ७ ऑगस्ट, २०१९

सुखराशी


 सुखराशी  
******* 
माझी इवलीशी 
सेवा केली गोड 
आनंदाचे झाड
केले मज

झालो सुखराशी 
धनाने अपार 
बुडाता व्यापार
नफ्यातला 

आता मी मोकळा 
होऊनिया वारा 
धावतो भरारा 
तुझ्या दारी 

कृपेचे देऊळ  
बांधले मनात 
आला गाभाऱ्यात 
स्वयमेव 

दत्त कल्पद्रुम  
रत्न चिंतामणी 
उघडली खाणी  
भावभक्ती 

विक्रांत सुखाच्या 
कल्लोळी लहर 
दत्त तटावर 
विसावली
.
© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in



**


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दत्त बडवतो

दत्त बडवतो ********* दत्त बडवतो मज बडवू दे  दत्त रडवतो मज रडवू दे  फटका बसता जागृती येता कुठे जायचे मज कळू दे  ॥१ प्रवाही वाहून ...