रविवार, १८ ऑगस्ट, २०१९

या शहरात



शहरात या 
***********
कधीचा मी 
शहरात या 
तरीही 
शहर हे 
माझे नाही 

जरी हे चेहरे 
ओळखीचे सारे 
तरी का इथे 
डोळ्यात पहारे 

माहित खड्डे   
तोंडपाठ वळणे 
ठरवून घडेना  
परि ते थांबणे 

देती कुणी त्या 
तीरी इशारे 
ओलांडण्या
पथ परी 
येती शहारे 

तू आहेस तिथे 
मजला 
हे ठाव जरी 
बुडतोच दिन   
रोजच्या अंधारी


डॉ.  विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com

००



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

स्वप्न

स्वप्न ****** तुझ्या पथावर राहावे पडून  जगणे सोडून उरलेले ॥ तुझिया नामाचा ऐकावा गजर  उघडावे दार अंतरीचे ॥ तूच एक चित्ती असावा भर...