शुक्रवार, २ ऑगस्ट, २०१९

तडजोड



करी जिंदगानी 
कुठे तडजोड 
जोडपी विजोड 
जगतात 

तिला तो मुळीच
शोभतही नाही 
तिला पर्वा नाही 
कुठे काही 

चाले व्यवहार 
देहाचा व्यापार 
फक्त कारभार 
जगण्याचा 

त्याला काही देणे 
तिला काही घेणे 
वाचुनी चालणे 
निराधार 

काय मिळविले 
वाहता बाजारी 
फाटलेली झोळी
अंतृबाह्य  

कशाला वाहती 
काळोखाचे भार 
प्रेत  जगणार 
आशाहीन 

विक्रांत पाहतो 
दुनिया अंधारी 
आपुल्या शेजारी  
दाटलेली 

फुंक दत्तात्रेया 
तयात तो  प्राण 
जीवनाचे दान 
देई तया


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भक्ताचिया गोष्टी

भक्ताचिया गोष्टी ************** भक्ताचिया गोष्टी डोळा आणी पूर  भावनांनी उर भरू येई ॥१  आहाहा किती रे भाग्याचे पाईक  पातले जे सुख...