शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०१९

अवघे लाजिरे




अवघे लाजिरे

**********


अरे बुद्धी माझी
अजून वाकडी 
बसली बोंकांडी 
वृतीच्या रे

अहा वरवर 
पांघरले छान 
गुण आवरण 
दाखविण्या

परि हसतात 
सारे अवगुण 
घेतात गांजून 
पदोपदी 

काम क्रोध मोह 
नटले सात्विक 
लावतात भीक 
मागावया

साधनेचा दंभ 
साधक मत्सर 
बसे उरावर 
वेताळसा

मिळताच संधी 
येती उसळवून 
घेतात ग्रासून 
नभ सारे

असे हे पहाड 
कसे करू पार 
तुझाच आधार 
दत्तात्रेया

विक्रांत पाहतो 
पराभव सारे 
अवघे लाजिरे 
अवधूता


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in‍


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...