रविवार, ४ ऑगस्ट, २०१९

घनरानी अंधारात



घनरानी अंधारात

*************
घनरानी अंधारात 
कोण होते सखी साथ  
पायाखाली विंचू काटे 
तया दूर ते सारत 

तुटलेल्या पावलात 
कोण होते बळ देत
शिणलेल्या या श्वासात 
चैतन्याचा स्पर्श होत  

खोलवर अंतरात 
कोण होते सांग गात 
कणोकणी भरलेल्या 
विश्वासाला चेतवत 

शोधू शोधू जाता तया  
चांदण्यात लुप्त होत 
मिटताच डोळे आत 
देहभान हरवत

गिरनारी सखा माझा 
माझ्या सा-या जीवनात ज
करूनिया घेत तप
जीवनाला अर्थ देत


                         :**

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in‍

००००००




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गिरनार परिक्रमा

गिरनार परिक्रमा *********** सरला प्रवास परी तुझा भास  वेढून मनास आहे दत्ता ॥१ माझे पदरव मज ऐकू येती  तरंग  गुंजती पाण्यावर ॥२ पा...