सोमवार, ५ ऑगस्ट, २०१९

क्रोध





क्रोध   
-----

घसरतो दत्ता
पुन:पुन्हा पथा
क्रोधाचा हा गाडा
अनावर

इवल्या मनाचा  
मोठा बुडबुडा
रिकामा खडाडा
वाजे डबा .

कळते मनाला
जरी चुकलेले
परि न थांबले
मान्य व्हाया

चुकताच ध्यान 
पुन्हा एक ठेच
पुन्हा एक वेच
साधनेचा

क्षमा याच पदी 
येणे पथावर
दग्ध अहंकार
करीत तो

माये तुज नम्र 
करितो नमन
घेई सांभाळून
बाळ तुझा

विक्रांत वेंधळा
क्रोधात आंधळा
लागतो पायाला
आज तुझ्या 

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in‍




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गिरनार परिक्रमा

गिरनार परिक्रमा *********** सरला प्रवास परी तुझा भास  वेढून मनास आहे दत्ता ॥१ माझे पदरव मज ऐकू येती  तरंग  गुंजती पाण्यावर ॥२ पा...