सोमवार, ५ ऑगस्ट, २०१९

कणभर पापे




कणभर पापे
होतात गगन 
देताच सोडून 
क्षण मात्रे  

करोडो सहज 
जातात सुटून 
खुर्दा चिटकून 
राही परी

सावध रे मना 
राही सांभाळून 
न दे कवळून 
मोह कधी 

अवधूत बापा
आण मार्गावर 
मन हे चुकार 
पुन्हा तुझ्या

काट्याचे कुरूप 
न दे रे होऊन 
टाकी उपटून 
त्याच क्षणी 

विक्रांता साधन
येऊ दे घडून 
सदैव बसून 
दारी तुझा *

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in‍

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गिरनार परिक्रमा

गिरनार परिक्रमा *********** सरला प्रवास परी तुझा भास  वेढून मनास आहे दत्ता ॥१ माझे पदरव मज ऐकू येती  तरंग  गुंजती पाण्यावर ॥२ पा...