शनिवार, ३ ऑगस्ट, २०१९

दिधले दत्ताने



दिधले दत्ताने 
********
खंत ना मजला 
आता ती कशाची 
आहे रे जायची 
तयारी ही ॥
अविट क्षणांचे 
सुंदर जगणे
दिधले दत्ताने 
मज ऐसे ॥
आप्त गोत्र आणि 
प्रिय मित्र सारे 
आनंदाचे झरे 
लेक बाळ ॥
सहज सुखाची 
जीवनसंगिनी 
अपार मी ऋणी  
तिचा असे ॥
धन्य माता पिता 
आलो तया पोटा
भाग्याच्याच वाटा 
जणू काही ॥
भेटले कीतीक
सखे सवंगडी 
हितचिंतक ती
पदोपदी ॥
कुणी थांबविले 
कोणी अडविले 
त्यात दडलेले 
दैवी हात ॥
जाहाले ते दृष्य 
येताच सुवेळ 
नच तयावर 
राग काही॥
मनी उमटती
फक्त कृतज्ञता
अवघ्या जगता 
देण्यासाठी ॥
कितीदा बोलावे 
साऱ्या धन्यवाद 
जोडूनिया हात 
नमितो मी ॥
विक्रांत सुखाचा 
दत्ताच्या कृपेचा 
भेटल्या जन्माचा 
ऋणाईत ॥
.
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...