बुधवार, १ मार्च, २०१७

कुठाय माझी लंगोटी





कुठाय माझी लंगोटी
रे कुठाय माझा लोटा
लबाड करणी तुझी
दत्ता देई माझा सोटा ||

बरा राहशी एकटा
लावून आम्हा संसारा
दुरुनी मजा पाहशी
फिरविशी गरागरा ||

घरदार नाही तुला
मीठा पिठाची चिंता
का रे मग माझ्यामागे
लावसी असला गुंता ||

तुझ्याकडे येवू जाता
मोही घालसी लबाडा  
पुन्हा जडून लोभी मी   
वाहतो संसार गाडा ||

क्षणभर झालो जागा
म्हणून जाणतो थोडा
जै घेतले नाम तुझे
देई मज माझा वाटा ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

डॉ रजनी जगताप सेवापूर्ती निमित्त

डॉ रजनी जगताप सेवापूर्ती निमित्त  ******** तुम्ही जर एकदा रजनीला भेटला  तर तिला विसरूच शकत नाही  तिचे वागणे बोलणे असणे वैशिष्ट्य...