बुधवार, १५ मार्च, २०१७

|| दत्त मूर्ती ||








|| दत्त मूर्ती ||
************
उगा राहे आता
काही न बोलता
साजरी पाहता
दत्त मूर्ती ||

निर्मल धवल
निखळ स्नेहळ
देखणी केवळ
कृपा दुर्ष्टी ||

पाहू किती ती
नजर न धाती
सर्वांगा फुटती
लक्ष डोळे ||

विश्वाचे चैतन्य
आकारी दाटले
प्रकाशी भरले
सूर्यबिंब ||

आणिक मागुती
पाहणे सुटले
भान हरपले
आपोआप ||

दाविलेस स्वप्न
देवा विलक्षण
दिले पेटवून
जागेपण ||

विक्रांत सुटला
जाणीवी दाटला
चैतन्यी सजला
दत्ताचिया ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मिच्छामी दुक्कडम ( जरा अवेळी )

मिच्छामी दुक्कडम (जरा अवेळी ) ****** वळवले दाम ठोठावले काम  मिटे आश्वासन कुठे वर्धमान ॥ तुझाच भरोसा आता तीर्थंकरा उणीव न यावी तु...