झाकले ते प्रेत
होते
**************
सुटलाच गंध शेवटी
झाकलेले प्रेत
होते
उडणे कफन तर
केवळ निमित्त
होते
का मारल्यास चकरा
तेथे कुणीच
नव्हते
होणार शेवट काय
तुजला माहित होते
नेहमीच आडवाटे
फसवे भूत असते
करण्यास घात वार
संधीच पाहत होते
जग गोजिरे दुरून
आत जळत असते
देण्यास मिठी तू
जाता
मूर्ख फसगत होते
रडशी वेड्या कशाला
झाले जे होणार
होते
रे मान सुख तू मनी
दत्त बडवित होते
विक्रांत दु:ख
तुझे हे
सांग का कधी
नव्हते
पाचवीस पुजलेले
सदा नशिबात होते
हा प्याला अजुनी
कारे
मागतो विश्वास
खोटे
फुटे बाटली जरी नि
जगणे संपत होते
डॉ.विक्रांत
प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा