तू अहिल्या !!
जग तसे छोटे आहे
दिशेमध्ये भरलेले
तू कोठे जाशील राणी
मन जरी वादळले
बंद कर दरवाजा
कड्याकुड्या लाव
जरा
जन्म गेला
अंधारात
सवयीचा भाग सारा
बघ स्वप्न पाहू नको
मोहजळी पोहू नको
पोटासाठी गोतासाठी
सुरक्षाही सोडू
नको
तसे काय कमी इथे
संसाराचे चाले
गाडे
हरवता मन उगा
त्याला देई धडे
थोडे
उडतील वर्ष बाकी
सरेल ही जिंदगानी
येवूनिया गेल्या
किती
तयातील तू कहाणी
कुणी म्हणे तुला
आहे
पंख काही मालकीचे
काहीतरी ऐकू नको
पदर ग ते शोभेचे
चंद्र मुळी तुझा
नाही
तुझे नाही तारे
वारे
येईल मालक घरी
तोच तुझा बाई
सारे
आवड नावड तुझी
त्याला काय मोल
आहे
म्हण नाथ स्वामी
पती
व्यर्थ जरी बोल
आहे
कुणीतरी भेटलेले
प्राणप्रिय
वाटलेले
भ्रम असतात असे
जागोजागी पडलेले
मरू देत वेडे मन
जळू देत व्यर्थ
तन
अहिल्या होतेच अंती
अशी वा तशी पाषाण
डॉ.विक्रांत
प्रभाकर तिकोणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा